Paramedical Courses
वैद्यकीय क्षेत्रात फक्त डॉक्टर्सच नव्हे तर इतर ४० पेक्षा अधिक व्यवसायाच्या संधी आहेत. यामध्ये किमान दहावी उत्तीर्ण विद्यार्थीसुद्धा प्रवेश घेऊ शकतो आणि याआधारावर नोकरी करू शकतो.
Hotel & Hospitality Management
सर्वात मोठ्या प्रमाणात चालणारे हे महत्वाचेक्षेत्र आहे आणि कर्मचारीवर्ग हा याक्षेत्राचा श्वास आहे. एका सर्व्हेनुसार, दरवर्षी शंभर पेक्षा जास्त नवीन हॉटेल्स सुरु होत आहेत आणि म्हणून या क्षेत्रातील शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यंना भरपूर संधी उपलब्ध आहेत. दहावी किंवा बारावी उत्तीर्ण झालेला कोणताही विद्यार्थी यात प्रवेश घेऊ शकतो. हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट मधील पदवीला हॉटेलमॅनेजमेंट असेही म्हटले जाऊ शकते.
Fire & Safety Management
औद्योगिक क्षेत्रात भारत दिवसेंदिवस प्रगती करत आहे अनेक नवनवीन देश भारतात गुंतवणूक करत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात काम करणाऱ्या या इंडस्ट्रीजला कायद्याने फायर अँड सेफ्टीसाठी स्टाफ भरणे बंधनकारक असते. त्यामुळे फायर अँड सेफ्टीचे प्रशिक्षण घेऊन विद्यार्थी यासंधीचा फायदा घेऊ शकतात. दहावी किंवा बारावी उत्तीर्ण झालेला विद्यार्थीयाचे प्रशिक्षण घेऊ शकतो.
Heavy Equipment
Training
सध्या याक्षेत्रात प्रचंड संधी उपलब्ध आहेत. कारण महाराष्ट्रामध्ये क्रेन, फोर्कलिफ्ट, हायड्रा अशा विविध मशिन्स चालविण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी वर्ग उपलब्ध नाही. किमान आठवी उत्तीर्ण झालेला कोणताही विद्यार्थीयाचे प्रशिक्षण घेऊन चांगल्या वेतनावर नोकरीला लागू शकतो.
Mobile And Laptop Repairing
मोबाईल हँडसेट दुरुस्तीच्या क्षेत्रात स्वयंरोजगाराची क्षमता वाढविण्यासाठी हा कोर्स बनविला गेला आहे. या कोर्समध्ये मोबाइल फोनचे जनरेशन, मोबाईल हँडसेट मध्ये वापरले जाणारे घटक, मोबाइल फोन हार्डवेअर ट्रबल शूटिंग (पाण्याचे नुकसान, हँग, चार्जिंग समस्या, नेटवर्क समस्या,पॉवर संबंधी समस्या, कीपॅड समस्या इ.), सॉफ्टवेअर इन्स्टॉल करणे , फ्लॅशिंग, गुप्त कोडचा वापर यांचा समावेश आहे. या कोर्समध्ये संगणक आधारित निदान साधनां सोबतच सगळ्या गोष्टींचे प्रशिक्षण दिले जाते.
Draftsman
आर्किटेक्चरल ऑफिस, विविध कारखाने, अभियांत्रिकी कंपन्या, सीएडी-विशिष्ट कार्य-गट, बांधकाम कंपन्या, अभियांत्रिकी सल्लागार कंपन्या, नैसर्गिकस्त्रोत कंपन्या किंवा स्वतंत्र स्वयंरोजगार इतक्या संधी ड्राफ्टमनला उपलब्ध असतात. अभियांत्रिकी विभागाचा हा एक महत्वाचा भाग आहे.
Plumbing and Wiring
इलेक्ट्रिकल आणि प्लंबिंग (एमईपी) इमारत डिझाइन आणि बांधकाम या विभागांचे प्रशिक्षण येथे दिले जाते .हे बांधकाम विभागामधील दोन महत्वाचे आधारस्तंभ आहेत.
BE level Courses
अभियंत्यांना मदतनीस म्हणून लागणाऱ्या व्यक्तीला तांत्रिक बाबींचे ज्ञान असणे आवश्यक आहे , याच तांत्रिक बाबींचे शिक्षण देण्यासाठी या कोर्स ची निर्मिती करण्यात आली आहे.